जेव्हा मुले संध्याकाळी खेळून घरी येतात, क्लासला जाऊन
येतात, किंवा दमून घरी
येतात, तेव्हा कधीही
मुलांना आल्या-आल्या “आता अभ्यासाला
बसा” असं
अजिबात सांगू नका. विशेषत: खेळून आल्यावर
तर नाहीच नाही. कारण ‘अशावेळी’ हे वाक्य ऐकलं
की मुलांना संताप येतो. अभ्यासाविषयी
मनात अनास्था निर्माण होते. आणि मग अभ्यास न करण्याच्या नवनवीन सबबी मुले सुरू करतात. या सबबी ऐकल्या
की तुमचं डोकं फिरू लागतं. अशावेळी तुमच्या मुलाला समजून घेण्याऐवजी, तुमच्या
अंतर्मनात दडून असलेला राग एकदम उसळून वर येतो, तुम्ही बोलू लागता, “एव्हढावेळ खेळ
झाला, टाइमपास झाला, तरी समाधान झालं
नाही.
अजूनही तुला अभ्यास करायचा नाही. तू काय ठरवलं
आहेस तरी काय?”
Saturday, July 25, 2020
तुमच्या मुलाच्या अभ्यासची गती वाढण्यासाठी एक सोपी युक्ती
पालकांनो, मुलांना थोडा वेळ द्या, त्यांना समजून घ्या!
हल्ली मुलांचे संगोपन करणे म्हणजे कौशल्याचे
काम आहे.
कारण स्पर्धात्मक युगात माझी मुलगी किंवा माझा मुलगा मागे
पडू नये यासाठी पालकांना सतत चिंता सतावत असते. पण लक्षात घ्या
मुलं हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात त्याला जसं घडवू तसं ते घडतं. मुलांना आपण जे
सांगू किवा आपण जसं बोलतो त्याचा परिणाम मुलांवर होतो.
-
जेव्हा मुले संध्याकाळी खेळून घरी येतात , क्लासला जाऊन येतात , किंवा दमून घरी येतात , तेव्हा कधीही मुलांना आल्या - आल्या “ आता अभ्यासाला बसा ...
-
हल्ली मुलांचे संगोपन करणे म्हणजे कौशल्याचे काम आहे . कारण स्पर्धात्मक युगात माझी मुलगी किंवा माझा मुलगा मागे पडू नये यासाठी प ालकांना सतत चि...