हल्ली मुलांचे संगोपन करणे म्हणजे कौशल्याचे
काम आहे.
कारण स्पर्धात्मक युगात माझी मुलगी किंवा माझा मुलगा मागे
पडू नये यासाठी पालकांना सतत चिंता सतावत असते. पण लक्षात घ्या
मुलं हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात त्याला जसं घडवू तसं ते घडतं. मुलांना आपण जे
सांगू किवा आपण जसं बोलतो त्याचा परिणाम मुलांवर होतो.
त्यामुळे पाल्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक, वाढ होत असताना
वस्तुरूपी प्रेम नाही तर तुम्ही दिलेला वेळ बहुमूल्य असतो. त्यामुळे
पालकांनी TV,
Laptop, Computer, Tab, Mobile बाजूला ठेवून काही मुलांसोबत गप्पा मारायला हव्यात. हा उपक्रम
खूप सकारात्मक बदल घडवून आणतो, आपल्यात आणि आपल्या पाल्यातही. आजची पिढी Gadget प्रिय. ती काळाची
गरज सुद्धा आहे पण आपला पाल्य Gadget वर किती वेळ असतो. नेमक इंटरनेटवर
काय Surfing करतोय? यावर लक्ष
ठेवायला काहीच हरकत नाही. मात्र ते ही त्याला नकळत.
सध्या स्वतःला त्रास देणं (self harm), चिडचिड करणं, सतत रागावणं, ह्या गोष्टी
सध्या मुलांमध्ये जास्त दिसून येतात. अशात मुलांशी बोलण्यात काहीच उपयोग नसतो. यावेळी आपलाही
पारा चढण्याची शक्यता असते. अशा वेळी पाल्याचे म्हणणे नीट ऐकून घ्यावे. नेमक्या कुठल्या
मुद्यावर चिडचिड होतेय ते समजून घ्यावे. राग, चिडचिड कमी झाला
कि शांतपणे आपला मुद्दा समजावून देता येतो. प्रसंगी ज्या
मुद्द्यावरून चिडचिड झाली आहे त्याचीच गोष्ट तयार करावी, आपल्या पाल्याला केंद्रस्थानी ठेवावं आणि
गोष्टी रूपातून आपला मुद्दा पटवून देता येईल.
एखाद्या वस्तूचा अट्टाहास पाल्याने धरला असेल
तर ती खरंच गरजेची आहे का? हे बघणं गरजेचं आहे किंवा त्या वस्तू ऐवजी दुसरी जी
उपयोगाची वस्तू आहे ती देणं कधी हि सोयीस्कर. पण कधी-कधी नाही
म्हणायला हरकत नाही. नाही
म्हणण्यात ही गंमत आहे. नाही
म्हणणं सुद्धा एक कला आहे. होतं काय, मुल वयात येत असताना त्यांना स्वतंत्र पणाची जाणीव होत असते.
मग त्यांना त्यांच्या आवडी-निवडी प्रमाणे
राहायला, वागायला आवडतं. यावेळी
थोड त्यांच्या म्हणण्या नुसार चालवं. त्यांच्या आवडी-निवडी जाणून
घ्याव्यात. पाल्याला
त्याच्यासाठी काय योग्य आहे याची जाणीव करून द्यावी. मुलं चुकीच्या
मार्गीला जाऊ नये यासाठी वेळोवेळी त्यांच्या Friend Circle चा आढावा घेणे
खूप गरजेचे आहे. मुळात मुलांना थोडासा वेळ देणं आणि त्यांच्या गरजा समजून
घेणं याशिवाय पालकत्व वेगळे नाही.
No comments:
Post a Comment